पुणे : पुण्यातील (Pune Crime News) सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
गोपाळ कैलास मंडवे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. गोपाळ मंडवे यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. सिंहगड रोड पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.