Pune University Fight

Pune University : पुणे विद्यापीठात राडा; एसएफआय-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

768 0

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन (Pune University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे समजत आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापीठात संघटनेी सदस्य नोंदणी सुरू होती. त्यावेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला.

या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एसएफआयच्या कार्यकर्त्याला अभाविपचे कार्यकर्त्यांनी खाली पाडून मारताना दिसत आहेत. तर, एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एसएफआयचे कार्यकर्ते काठीने मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे पुणे विद्यापीठामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!