Birthday Celebration

चर्चा तर होणारंच ! पुण्यातील ‘या’ गावाने एकाच दिवशी साजरा केला 51 जणांचा बड्डे

661 0

पुणे : 1 जून हा वाढदिवस (Birthday) दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक लोकांचा वाढदिवस याच दिवशी साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून पुण्यातील एका गावात एक दोन नाही तर तब्बल 51 जणांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगली आहे. भोर (Bhor) तालुक्यातील म्हाळवडी गावात (Mhalwadi Gaon) युवकांच्या कल्पनेतून ही योजना आखण्यात आली. 1 जून रोजी गावातल्या 51 जणांचा वाढदिवस गावच्या मंदिरात सामुहिकरित्या केक कापून साजरा करण्यात आला.

या 51 जणांमध्ये गावातील 101 वर्षाच्या आजींसह, 21 महिला आणि 30 पुरुषांचा समावेश होता. केक कापून झाल्यानंतर गावकऱ्यांना भोजन आणि पावनखिंड चित्रपटाची मेजवानी देण्यात आली. वाढदिवसाचा सोहळा पाहून जेष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. या अनोख्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. या गावात एकूण 200 घरे असून 1263 एवढी लोकसंख्या आहे.

गावचे सरपंच दत्तात्रेय बोडके यांच्यासह सोपान बोडके, साहेब राव बोडके, एकनाथ बोडके, सर्जेराव बोडके, तानाजी बोडके, अण्णा बोडके, दशरथ बोडके, बाजीराव बोडके, उमेश बोडके आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा उत्तमरीत्या पार पडला.

Share This News
error: Content is protected !!