पुणे : पुणे (Pune News) बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला.यामध्ये एका भरधाव कंटेनरने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नवले ब्रिजच्या अलिकडे असणाऱ्या जांभूळवाडी दरीपुलावर हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
नव्या कात्रज बोगद्याच्या पुढे बंगलोरहून पुण्याच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगात येत होता. तीव्र उतारावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.