पुणे : बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार रामहरी कराड यांना जाहीर

296 0

पुणे : पत्रकारीता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार २०२३ हा पुरस्कार पुणे येथील दै. नांदेड एकजूटचे प्रतिनिधी रामहरी तुळशीराम कराड यांना जाहीर झाला आहे. अशी घोषणा मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य मुंबई याचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी केली.

संस्थेचा २२ वा वर्धापण दिन सोहळा व पत्रकार दिनाचे औचित्य साधत अन्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४ वा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय, डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृह , शारदा सिनेमा जवळ, नायगाव, दादर,(पुर्व), मुंबई येथे संपन्न होणार आहे.

ठाणेचे आमदार संजय केळकर, मुंबई येथील माहिती व जनसंपर्क महासंचानालय चे संचालक हेमराज बागूल आणि नगरपाल डॉ. जगनाथराव हेगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी दै. प्रहारचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर असतील.

या व्यतिरिक्त कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार २०२३ ज्येष्ठ पत्रकार सहार बिराडे( दै. लोकसत्ता वसई विहार,मुंबई), तर ज्येष्ठ पत्रकार, लेकख साहित्यिक डॉ. सकृत खांडेकर यांना जीवन गौरव पुरस्कार २०२३ व गंगाधार म्हात्रे (आदिवासी सेवक विरार) यांना घोषित करण्यात आला आहे.

तसेच पत्रकार भूषण पुरस्कार २०२३ अरूण सुरडकर(दै. सामपत्र, औरंगाबाद), भारत शंकरराव गड्डेवार, (सहसंपादक दै. नांदेड एकजूट नांदेड), दिलीप जाधव (प्रतिनिधी दै. रत्नागिरी टाईम्स) व दिपक सोनवणे, (दै. नवनगर, नवी मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!