Pune Accidents : हॅन्ड ब्रेक लावायला विसरला चालक : ट्रॅक्टरने दिली 6 वाहनांना धडक

463 0

पुणे : बिबवेवाडी मध्ये एक विचित्र अपघाताने खळबळ उडाली आहे. अप्पर जुना बस स्टॉप भागामध्ये एक ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर बाजूला लावून चहा घेण्यासाठी म्हणून उतरला.

परंतु या रस्त्यावर उतार असल्याने ट्रॅक्टर आपोआप पुढे सरकू लागला आणि उताराच्या दिशेने अचानक या ट्रॅक्टरने वेग घेतला. काही क्षणातच या ट्रॅक्टरने एवढा वेग घेतला की, समोरील सहा वाहनांना सरळ धडक देत मोठा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ट्रॅक्टर चालक जेव्हा ट्रॅक्टर मधून उतरला तेव्हा तो हॅन्ड ब्रेक लावायलाच विसरला. आणि त्यामुळे हा अपघात झाला आहे. या ट्रॅक्टरचालकाने भर रस्त्यात उतारावर आपला ट्रॅक्टर थांबवला. त्याच्या या बेजबाबदार कृत्याबद्दल बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली,तरी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!