Pune Accident

Pune Accident : भरधाव कारची बाईकला धडक ! एकाचा मृत्यू

602 0

पुणे : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील (Pune Accident) जुन्नरमध्ये अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर पिंपळगाव फाटा परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात एका फॉर्च्युनर गाडीनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. योगेश भारमळ असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर काळू भारमळ आणि रंजना भारमळ हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

कसा घडला अपघात?
जुन्नरमधील पिंपळगाव फाटा परिसरात हा भीषण अपघात झाला. चारचाकीनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये योगेश भारमळ, काळू भारमळ आणि रंजना भारमळ हे गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी काळू भारमळ हे अपघातानंतर कोमामध्ये गेले तर रजंना भारमळ यांच्या पायांना अनेक ठिकाणी फॅक्चर झाले आहे. योगेश भारमळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

अपघातग्रस्त कुटुंब हे गरीब आहे, माेलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. पैसे नसल्यामुळे उपचाराला विलंब झाला. त्यामुळे यातील एकाला आपला प्राण गमावावा लागल्याची माहिती समोर येत आहे. आमच्या रुग्णाजवळ पैसे नसल्यामुळे उपचार मिळण्यास विलंब झाला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!