Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

435 0

छत्रपती संभाजीनगर: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन तरुणाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना अटक केली.

Share This News
error: Content is protected !!