PRASAD DADA TAMKAR PUNE SCAM: सब मोह माया है असं सांगणाऱ्या बाबाला स्वतःच्या भक्तांचे खाजगी क्षण बघायचा मोह आवरता आला नाही. तो केवळ भक्तांचे खाजगी क्षण बघतच नव्हता तर चक्क त्याचं रेकॉर्डिंगही करून ठेवायचा.. हे ऐकून कदाचित कुणालाही धक्का बसेल, हे खरं आहे. ही डोकं चक्रावणारी घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. या बाबाने नेमके काय काय प्रताप केले ? आणि आता त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई केलीये पाहूया...

PRASAD DADA TAMKAR PUNE SCAM:भक्तांच्या खासगी क्षणांवर ‘डोळा’ ठेवणारा भोंदूबाबा !; सापडला तावडीत; घातला कोठडीत!

94 0

PRASAD DADA TAMKAR PUNE SCAM: सब मोह माया है असं सांगणाऱ्या बाबाला स्वतःच्या भक्तांचे खाजगी क्षण बघायचा मोह आवरता आला नाही.

तो केवळ भक्तांचे खाजगी क्षण बघतच नव्हता तर चक्क त्याचं रेकॉर्डिंगही करून ठेवायचा.. हे ऐकून कदाचित कुणालाही धक्का बसेल, हे खरं आहे.

ही डोकं चक्रावणारी घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. या बाबाने नेमके काय काय प्रताप केले ?

आणि आता त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई केलीये पाहूया…

हिडन ॲप द्वारे भक्तांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या प्रसाद बाबा तामकरला अटक
ही अजब घटना बावधन परिसरात घडली आहे.

29 वर्षीय प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार PRASAD DADA TAMKAR PUNE SCAM: असं प्रकरणातील आरोपी बाबाचं नाव असून त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी एका 39 वर्षीय भक्तानं बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा बाबा सुस, औंध, बाणेर, बावधन, मुळशी या परिसरात प्रचलित आहे.

प्रसाद दादा म्हणून तो भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे.

सुस परिसरात त्याचा मठ असून या मठात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

या मठात श्री स्वामी समर्थांची मोठी मूर्ती असून हा बाबा स्वतःला स्वामी समर्थांचा भक्त म्हणून घेतो.

तो दर गुरुवारी हा बाबा भक्तांच्या दर्शनासाठी मठात बसतो. अनेक भक्त त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात.

हा बाबा त्यांच्याशी एकांतात आपुलकीने बोलतो.

भूत उतरवण्याच्या बहाण्याने आई, मुलगी, मामी आणि आजीवरही बलात्कार; अखेर भोंदू बाबाचा पर्दाफाश!

त्यानंतर काही दिवसात त्याला भक्तांच्या आयुष्यात काय सुरू आहे, कसं सुरू आहे

या सगळ्याचीच अनुभूती होते. याविषयी तो भक्तांना सांगतो आणि आपण बाबांना काहीच न सांगता त्यांना स्वतःहून कसं काय समजलं ?

याचाच अर्थ त्यांच्याकडे दिव्यदृष्टी आहे, असा भक्तांचा समज होतो. आणि त्यातूनच या बाबाच्या जाळ्यात हजारो भक्त अडकले जातात.

मात्र हे सगळं नेमकं कसं घडत होतं ते या फिर्यादीवरून उघडकीस आलं. मठात येणाऱ्या भक्तांना हा बाबा त्यांचं मरण जवळ आलं आहे असं सांगून भीती दाखवायचा.

या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मंत्र छाप करावा लागेल असं सांगून एकांतात बोलवायचा.

त्यावेळी भक्तांचा मोबाईल आणि त्यांचा पासवर्ड घ्यायचा.

भक्त मनःशांतीत मग्न असताना बाबा त्यांच्या फोनमध्ये गुपचूप ‘एअर ड्रॉइड कीड’ हे हिडन अ‍ॅप डाऊनलोड करायचा.

हे अ‍ॅप फोनच्या वॉलपेपर वर दिसत नव्हतं मात्र बॅकग्राऊंडमध्ये चालू असायचं.

या ॲप मधून भक्तांचा कॅमेरा, लोकेशन, आवाज याचा एक्सेस बाबाला मिळायचा.

त्यातूनच हा बाबा भक्त कुठे आहेत ?

काय बोलत आहेत ‌? त्यांनी कोणते कपडे घातले आहेत हे

पाहायचा आणि भक्तांना फोन करून याच गोष्टी सांगायचा.

त्यामुळे बाबाकडे दिव्यदृष्टी आहे असं भक्तांना वाटायचं.

या बाबाने अनेक भक्तांच्या मोबाईल मध्ये हे हिडन ॲप डाऊनलोड केलेलं होतं.

अशाच एका तरुण भक्ताचा मोबाईल वारंवार गरम होत होता.

त्यामुळेच त्याने टेक्नॉलॉजीची माहिती असलेल्या एका मित्राला हा मोबाईल दाखवला.

मित्राने लॅपटॉपच्या सहाय्याने मोबाईल कशामुळे हिट होत आहे हे तपासलं.

त्यावेळी हे हिडन मोबाईल मध्ये आढळून आलं.

भक्ताने हा मोबाईल कोणाच्या हातात दिला होता का ?

असं विचारल्यानंतर बाबा शिवाय मोबाईल कधीच कोणी घेतलेला नाही,

असं भक्ताने सांगितलं.

मग या भक्ताने आणखी काही भक्तांशी संपर्क साधून त्यांचेही मोबाईल तपासले.

या सर्व मोबाईल मध्ये हे हिडन ॲप आढळून आलं.

त्यामुळेच आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर या भक्तांनी बाबाला जाब विचारला.

Share This News
error: Content is protected !!