धक्कादायक ! फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने केला इंजिनीयर महिलेवर बलात्कार

581 0

पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने इंजिनीयर महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.मोशी,अकुर्डी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी १५ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित ३० वर्षीय महिलेने शुक्रवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.विक्रम गणपत फडतरे वय ३४, रा. भिलारेवस्ती, पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.पीडितेशी मैत्री वाढवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, इंजिनीयर महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीशी वारंवार मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असे फिर्यादीत नमूद आहे.विक्रम फडतरे हा पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे. विवाहित असलेली पीडित फिर्यादी महिला इंजिनिअर असून एका खाजगी कंपनीत नोकरीलाअसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!