PMPML

PMPML Strike : पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे

629 0

पुणे : पगार वाढीच्या कारणास्तव पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांच्या चालकांनी संप (PMPML Strike) पुकारला होता. या संपामुळे (PMPML Strike) प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी संप पुकारल्यानंतर चालकांनी तातडीने संप थांबवावा, असे आदेश राज्याच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिल्यानंतर हा संप अखेर मागे घेण्यात आला.

ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील कोथरूड, पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील कंत्राटी चालकांनी पुकारलेला संप मागे घेतला. कोथरूड डेपोकडील कंत्राटी चालकांनी शनिवार 26 ऑगस्ट रोजी संप मागे घेतला तर पुणे स्टेशन व वाघोली डेपोकडील कंत्राटी चालकांनी रविवारी संप मागे घेतला. पगार वाढ न दिल्याने 200 चालक या संपात सहभागी झाले होते.

Share This News
error: Content is protected !!