पिंपरी -चिंचवड महापालिकेत ‘या’ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होत आहे भरती; लगेच करा अर्ज

979 0

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. या पदासाठींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये निरीक्षक आणि आरोग्य सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्या लेखी परीक्षेची गरज भासणार नाही. या पदांसाठीची मुलाखत 09 जून 2023 रोजी पार पडणार आहे.

‘या’ जागांसाठी भरती
यामध्ये निरीक्षक आणि आरोग्य सहाय्यक या पदांसाठी ही भरतीप्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये एकूण 32 जागांसाठी ही भरतीप्रक्रिया पार पडणार आहे.

अधिक माहितीसाठी पुढील पीडीफ पहा
16805279411685345724

निरीक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सरकारी किंवा निमशासकीय संस्थांमध्ये समकक्ष पदावर किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त सरकारी संस्थेतून संगणक पात्रता आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

आरोग्य सहाय्यक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सरकारी किंवा निमशासकीय संस्थांमध्ये समकक्ष पदावर किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त सरकारी संस्थेतून संगणक पात्रता आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

कोणती कागदपत्रे लागणार?
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता
कै.मधुकर पावले सभागृह, तिसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी – 411 018

Share This News
error: Content is protected !!