संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीची पुणे येथील दक्षिण कमांड मुख्यालयाला भेट

377 0

एससीओडी अर्थात संरक्षण विषयक स्थायी समितीने ‘संरक्षण दलांच्या धोरणात्मक कार्यकारी सज्जते’चा आढावा घेण्याच्या उद्देशाने 26 ऑगस्ट 2022 रोजी, पुणे येथील दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली.

खासदार तसेच एससीओडीचे अध्यक्ष जुएल ओराम यांच्या नेतृत्वाखालील इतर 13 सदस्यांच्या समितीचे कमांडच्या मुख्यालयात आगमन झाले. या भेटीदरम्यान, परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, या पदकांनी सन्मानित, एडीसी आणि दक्षिणी कमांडचे लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन यांनी, स्वातंत्र्यापासून या कमांडने घडविलेला समृध्द इतिहास आणि वारसा, देशाची सुरक्षा तसेच प्रादेशिक एकात्मता राखण्यात या कमांडने बजावलेली भूमिका आणि या कमांडतर्फे हाती घेण्यात आलेले अनेक उपक्रम तसेच उपाययोजना याबाबत समितीच्या सदस्यांना माहिती दिली.

त्यानंतर दक्षिण कमांडच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांशी संवाद साधला. भारतीय लष्कराच्या सर्व कमांडपैकी, दक्षिण कमांडचे मुख्यालय हे सर्वात जुने असून या कमांडकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. संरक्षण क्षेत्रविषयक या स्थायी समितीची स्थापना संसदेतर्फे करण्यात आली असून या समितीमध्ये निवडक संसद सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने निश्चित केलेल्या संरक्षण विषयक धोरणांचे तसेच निर्णयांचे कायद्याच्या दृष्टीकोनातून परीक्षण करणे या या समितीच्या स्थापनेमागील उद्देश आहे.

Share This News
error: Content is protected !!