Vaishali Hotel

Vaishali Hotel : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचा वाद थेट पोलिसांत; काय आहे नेमके प्रकरण?

1106 0

पुणे : पुणे शहरात प्रसिद्ध असलेले हॉटेल वैशाली (Vaishali Hotel) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हे हॉटेल (Vaishali Hotel) खवय्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. सध्या हे हॉटेल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. हे हॉटेल बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झाला आहे.या हॉटेलवर मालकी कोणाची? यावरून आहे वाद सुरु आहे. हा वाद आता थेट पोलिसात गेला आहे. या प्रकरणी हॉटेल मालकाच्या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

काय आहे नेमका वाद ?
हे हॉटेल जगन्नाथ शेट्टी यांनी सुरु केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. यानंतर हॉटेल मालकाच्या मुलीने तिच्या पतीवरच बंदुकीचा धाक दाखवून पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतल्याचा आरोप केला आहे. या माध्यमातून त्याने हे हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा आरोप मुलीने केला आहे. एवढेच नाही तर लग्नाआधी पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा आरोप केला आहे. यामुळे पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दखल करण्यात आला आहे.

Liver Donate : पोरीने ऋण फेडले! बापाला यकृत दान करून मरणाच्या दारातून माघारी आणले

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
हॉटेल (Vaishali Hotel) मालकाच्या मुलीच्या तक्रारीवरुन या प्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव (वय 38), अभिजित विनायकराव जाधव (वय 40), विनायकराव जाधव (वय 65), वैशाली विनायकराव जाधव (वय 60) यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!