Pune Airport

पुणे – बंगळुरू विमान 10 तास लेट; एअरपोर्टवर प्रवाशांचा गोंधळ (Video)

455 0

पुणे : पुण्यातून विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे विमानातळावर प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे. पुण्यावरून बंगळुरूला (Banglore) जाणाऱ्या विमानाने 10 तास झाले तरी उड्डाण घेतले नसल्यामुळे प्रवाशी विमानतळावरच अडकून पडले आहेत. यामुळे विमानतळावर मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुणे ते बंगळुरू हे एअर एशियाचे (Air Asia) विमान पुणे विमानतळावरून सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी आपल्या निर्धारित वेळेवर निघणार होते. मात्र, या विमानाने अजूनही उड्डान केलेले नाही. त्यामुळे, सुमारे 150 हून अधिक प्रवाशी पुणे विमानतळावर (Pune Airport) अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रतिक्षा गृहात थांबवण्यात आले. याबाबत प्रवाशांनी विचारणा केली असता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान उड्डाणाला उशिर होत असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेमुळे अनेकांच्या कामाचा खोळंबा झाला. पुणे एअरपोर्ट प्रशासनाला प्रवाशांनी धारेवर धरत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे जो पर्यंत आमची फ्लाईट येत नाही तो पर्यंत एक ही फ्लाईट आम्ही जाऊ देणार नाहीं अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!