District Legal Services Authority : 3 दिवसीय आधार कार्ड आणि शिधापत्रिका वाटप शिबीराचे आयोजन

247 0

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आधार कार्ड आणि शिधापत्रिका वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

परोपकार मित्र मंडळ, पांडव नगर चाळ नंबर पाच, वडारवाडी, पुणे येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी व आधार नोडल अधिकारी रोहिणी आखाडे फडतरे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने, तहसीलदार तथा सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी अपर्णा तांबोळी, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे संकेत शहा आदी उपस्थित होते.

या शिबिरात नागरिकांना नवीन आधार नोंदणी व दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका काढणे, नावे कमी व जास्त करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिरात 400 हून अधिक नवीन आधार कार्ड, 230 दुरुस्ती, 80 पेक्षा जास्त शिधापत्रिका दुरुस्ती आणि 150 नवीन अर्ज प्राप्त झाले.

Share This News
error: Content is protected !!