गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

7324 0

पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

गगन सतीश लाड (वय २३ वर्षे, रा. टिंगरे नगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तसेच युनिट 2 कडील पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, उत्तम तारू, गजानन सोनुने, विजय पवार हे सर्वजण सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रमजान ईदच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते. धनकवडी येथे आलेले असताना एक इसम पिस्तूल बाळगून तळजाई टेकडी सहकारनगर पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर उभा आहे. अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली.

दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक गुप्तपणे सदर ठिकाणी गेले असता एक इसम उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या कमरेला लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह आढळून आले. तसेच पॅन्टच्या उजव्या खिशात एक जिवंत काडतूस मिळाले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ सुनील पवार युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे , पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, उत्तम तारू, गजानन सोनुने, विजय पवार, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, कादिर शेख, पुशपेन्द्र चव्हाण, निखिल जाधव, समीर पटेल, नागनाथ राख यांनी केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!