पुणे:शुक्रवार पेठेतील जीर्ण झालेल्या वाड्याची पडधड;६ रहिवाशांची सुखरुप सुटका

387 0

पुणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 478 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुनाट वाडे आहेत.पावसाळ्यामध्ये अशी घरे पडण्याची दाट शक्यता असते.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी शहरातील एकूण 38 अतिजोखमीचे वाडे पुणे महानगरपालिकेने पाडले आहेत.तर शहरातील एकूण 478 वाड्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.


आज शुक्रवार पेठ,नेहरु चौक येथे तीन मजली असणारया कारंडे वाड्यातील जीना आणि भिंतीचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे.हा वाडा ८० वर्ष जुना असल्याचे समजते. घटनेची वर्दी अग्निशमन दलास मिळताच तात्काळ अग्निशमन दल दाखल झाले. या वाड्यात अडकलेल्या 6 रहिवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली असल्याचे समजते.

Share This News
error: Content is protected !!