“हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे…!”- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे VIDEO

194 0

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे माजी आमदार दीप्ती चवधरी ,काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदीही उपस्थित होते दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने नाना पटोले यांच्या स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने आदी यावेळी उपस्थित होते.

देशात कृत्रिम महागाई वाढवली गेली आहे ,खाजगीकरणाच्या निमित्तानं कृत्रिम बेरोजगारी वाढवली जातीये देशातला राज्यातला बळीराजा सुखी नाही तो आत्महत्या करतोय या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणावं आणि सद्बुद्धी द्यावी दगडूशेठ गणपती चरणी केल्याचं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

Share This News
error: Content is protected !!