निवडणुका नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

446 0

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरे यांची सभा सुरू आहे.पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करायचं? अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना नाव न घेता टोमणा मारला.

सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!