पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गंभीर प्रकाराचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून निलेशची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.
पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला होता, त्यावेळी तपासामध्ये समोर आलं की पोलिसांना चकवा देत घायवळ परदेशात पळून गेला. विशेष म्हणजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलिस प्रशासनावरच ताशेरे ओढले जात होते. घायवळने पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर त्याने पासपोर्ट काढला. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाची कागदपत्रे त्याने सादर केली. आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.