PMPL

पुणे पीएमपीच्या ताफ्यात नव्या 900 इलेक्ट्रिक बस येणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

447 0

पुणे : येत्या काळात पीएमपीच्या (PMP) ताफ्यात 900 इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. यामध्ये 600 बस केंद्र शासनाकडून ग्रोस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (Gross Cost Contract) या तत्वावर घेण्यात येणार आहे. तर 300 बस स्व: मालकीच्या छोट्या 7 मीटर लांबीच्या बस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पीएमपी कर्मचाऱ्यांचे आणि अन्य विषयांसंदर्भात चर्चा झाली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!