पुणे- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. चित्रा वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
ज्या महाराष्ट्र राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या शिक्षिका फातीमा, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई या सर्व थोर महिलांची परंपरा या महाराष्ट्राला आहे, अशा या महाराष्ट्राच्या भूमीत एक महिला दुसऱ्या महिलेचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करते यापेक्षा दुसरे दुर्दैव कुठले असेल. या ज्या राजकीय पक्षाच्या सदस्य आहेत, त्या भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का….? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी यावेळी विचारला.
तसेच अशाप्रकारे महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने या आंदोलन प्रसंगी करण्यात आली.
या आंदोलन प्रसंगी सौ . राजलक्ष्मी भोसले सुषमा सातपुते,प्रवक्ते प्रदीप देशमुख , मृणालिनी वाणी,लावण्या शिंदे, श्वेता मिस्त्री,प्रीती धोत्रे, पायल चव्हाण,सानिया झुंजारराव, अपर्णा पाटसकर, श्रद्धा जाधव, निलम खुडे, ऋतुजा देशमुख, अबोली सुपेकर, मयुरी तोडकर,पूजा नाशिककर,अर्चना चंदनशिवे ,अर्चना रिठे अनिता पवार,आरती गायकवाड ,शिला जगताप , आरती गायकवाड ,राखी श्रीराव ,ज्योती सूर्यवंशी ,हालिमा शेख ,यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.