Breaking News ! अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, तलवार उंचावल्याचा परिणाम

115 0

ठाणे- अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. सत्कारानंतर राज ठाकरे यांनी तलवार उंचावली होती. याच कारणाने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता येत आहे.

ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणाचीही तपासणी केली जाणार आहे. त्यांच्या भाषणात एखादे आक्षेपार्ह वक्तव्य आढळल्यास त्यावरूनही राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली. यापूर्वी मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार उंचावल्याप्रकरणी मोहित कंबोज, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला होता.

राज ठाकरे यांचा मशीदीवरील भोंग्यासाठी अल्टिमेटम

”३ मे राजी ईद आहे, माझी राज्य सरकारला गृह खात्याला विनंती आहे, कोणतीही दंगल कोणतीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही, आम्हाला ती इच्छा देखील नाही, महाराष्ट्राचं आम्हाला स्वास्थ बिघडवायचं नाही. पण आज १२ तारीख आहे, १२ ते ३ मे महाराष्ट्रातल्या सर्व मशीदीवरील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या, त्यांना सांगा, ३ तारखेपर्यंत सर्व मशीदीवरील लाऊडस्पीकर खाली उतरवले गेले पाहिजेत, खाली काढले पाहिजेत, ३ तारखेनंतर आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.” पण ३ तारखेनंतर जर भोंगे उतरवले गेले नाहीत, तर तिकडे हनुमान चालिसा वाजवली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

रक्तस्त्राव नाही ? मग सोमय्या यांना जखम कशामुळे झाली ? वैद्यकीय अहवाल आला समोर

Posted by - April 27, 2022 0
मुंबई – किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी महत्वाची अपडेट आलेली असून या हल्ल्यामध्ये सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला…

आता नाही तर कधीच नाही; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन

Posted by - May 3, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली असून मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला दिलेला…

शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह – रामदास आठवले

Posted by - April 8, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या…

अंगावर झाड कोसळून नवदाम्पत्याचा मृत्यू

Posted by - April 23, 2022 0
पुरंदर तालुक्यातील सासवड-वीर  रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.…

मोठी बातमी! अविनाश भोसले यांचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयकडून जप्त

Posted by - July 30, 2022 0
बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना आणखी एक मोठा धक्का…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *