चाकण- चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीचा चाकू भोकसून खून केल्याची घटना चाकण येथील मेदनवाडी गावात घडली आहे. संशयित आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अश्विनी सचिन काळेल (वय 23) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती सचिन रंगनाथ काळेल ( वय 33 ) याच्या विरोधात चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे
सचिन काळेल हा आपल्या पत्नीसोबत मेदनवाडी गावात अनंत हाईट्स या बिल्डिंगमध्ये गेल्या सहा महिन्यापासून भाड्याने राहत आहे. दोघं पतिपत्नींमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे होत असत. आरोपी सचिन हा अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. आज पहाटेच्या सुमारास अश्विनीचा गळा आवळून खून केला त्यानंतर चाकूचे वार करून फरार झाला. चाकण पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.