Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Highway : मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; द्रुतगती मार्गावर उद्या ‘या’ वेळेत घेण्यात येणार ब्लॉक

424 0

पुणे : पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai – Pune Highway) उद्या पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी सोमटणे फाट्याजवळ ही गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. ब्लॉकवेळी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या दरम्यान ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे, असं आवाहन एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अशी वळवणार वाहतूक…
मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गावरून सोडण्यात येतील.

मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेनने उसे खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्ग या रस्त्याने पुढे पुणेच्या दिशेला मार्गस्थ करण्यात येतील.

Share This News
error: Content is protected !!