Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Expressway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी 2 तासांचा ब्लॉक

1927 0

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai – Pune Expressway) पुणे वाहिनीवर कि.मी. 45/000 अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी 45 / 800 खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक 10.10.2023 रोजी करण्यात येणार आहे. या दरम्यान पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12.00ते दुपारी 2.00 या वेळेत पुर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर दुपारी 2.00 वाजता पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.

Share This News
error: Content is protected !!