Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घाणेरडे राजकारण ; महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रशांत जगताप यांच्यावर टीका

415 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी अनावरण झाले होते. मात्र सोमवारी दुपारी या पुतळ्याच्या मेघडंबरीचा काही भाग कोसळून पडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले.

त्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षांनी शहरात खूप अफवा पसरवल्या आहेत. राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षांनी नरेंद्र मोदी पुण्यात आले असता आंदोलन केली. तो त्यांचा अधिकार होता. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घाणेरडे राजकारण या मंडळीने केले. अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर केली आहे

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या
मेघडंबरीचे काम गळून पडले.

निकृष्ट दर्जाचे काम झाले. भाजपने घाई केली. पण हे अत्यंत चुकीचे आणि नागरिकांची भूल करण्याचे काम या शहराध्यक्षांनी थांबवले पाहिजे. मागच्या काही दिवसांतील त्यांची अनेक चुकीच्या विषयाची आंदोलन केली. त्यामुळे कालचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा नसता तर मी याला गांभीर्याने घेतले नसते. पुणे त्यांना सिरीयसली घेत नाही आणि आम्हीही घेत नाही.अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी वर केली आहे.

https://www.facebook.com/1380455935513531/posts/3811440122415088/

गेले ७० वर्ष ही मंडळी सत्तेत होती. ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करते. मात्र आजतागत त्यांना छत्रपती
गेले ७० वर्ष ही मंडळी सत्तेत होती. ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करते. मात्र आजतागत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारता आला नाही.

महापालिकेच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना अनावरणाचे निमंत्रण दिले होते. मात्र यावेळी ते उपस्थित राहिले नाहीत. आणि आज ते फेसबुक लाईव्ह करायला गेले. मग काल त्यांची अस्मिता कुठे गेली होती. खर तर पुतळा अनावरणासाठी याठिकाणी खूप सजावट करण्यात आली होती. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ते काम काढताना लाईटसाठी जो मोठा ट्रस्ट उभा केला होता. त्याचा धक्का लागून या मेघडंबरीचा एक तुकडा खाली कोसळला.

 

हा अपघात होता. मात्र यांनी त्याचे राजकारण केले.असा आरोप मोहोळ यांनी केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करू नका, ती आपली अस्मिता आहे. असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!