पुण्यातील मनसेची महाआरती उद्या नाही, तर ४ तारखेला होणार ! काय आहे कारण ?

409 0

पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मेची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र ४ मेपासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. सरळ भाषेत ‘त्यांना’ कळत नसेल तर एकदा होऊनच जाऊ द्या, असा आक्रमक सूरही त्यांनी लावला.

मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे स्थानिक पातळीवर मसने कार्यकर्त्यांनी उद्या ऐवजी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्याच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

Posted by - November 23, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार,…
Ahmednagar News

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Posted by - February 29, 2024 0
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने 200 जणांना विषबाधा झाली आहे.…

धक्कादायक : खेळताना बॉल काढण्यासाठी डबक्यात वाकला, तोल जाऊन पडल्याने बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - March 25, 2023 0
कल्याण : कल्याण पूर्वेकडील कैलास नगर परिसरात राहणारा बारा वर्षीय रियाज शेख हा मुलगा शाळा सुटल्यानंतर घराजवळच असलेल्या एका डबक्यात…
Pankaja-Munde

BRS कडून पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; राज्यात मोठी उलथापालथ होणार?

Posted by - June 24, 2023 0
मुंबई : ‘अबकी बार, किसान सरकार’ हा नारा बुलंद करीत, शेजारच्या तेलंगणा राज्यातून महाराष्ट्र राज्यातील राजकारणात भारत राष्ट्र समितीने (BRS)…

Breaking News : पुण्यात काँग्रेस भवनमध्ये भाजपचं आंदोलन, प्रचंड गोंधळ, पोलिसांची धरपकड.. VIDEO

Posted by - November 18, 2022 0
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुण्यामध्ये जोरदार निदर्शने सुरूच आहेत. आज पुण्यात काँग्रेस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *