Medha Kulkarni

Medha Kulkarni : भाजप मेधा कुलकर्णीची नाराजी करणार दूर; उद्घाटनानंतर नितिन गडकरी त्यांची निवासस्थानी घेणार भेट

682 0

पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे.त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि पुलाचे लोकार्पण आज पार पडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यापूर्वी भाजपमधील नाराजी बाहेर आली आहे. या उड्डाणपुलासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र याच मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपण नाराजी बोलून दाखवली आहे.

त्यामुळे आता भाजप मेधा कुलकर्णीची नाराजी दूर करणार आहे. या पुलाच्या उद्घाटनानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी त्यांची निवासस्थानी भेट घेणार आहेत. यामुळे आता ते मेधा कुलकर्णीची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!