रमणबाग प्रशालेत मराठी दिन साजरा

464 0

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मराठी भाषा दिन आणि शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या ७५ साहित्यिकांच्या हस्तलिखितांचे प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

शालाप्रमुख सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका अर्चना पंच, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, दिलीप रावडे, मराठीच्या शिक्षिका ऋचा कुलकर्णी, शुभांगी पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी ही संस्कृतोद्भव भाषा असून तिचे वैभव जाणून घ्यावे, मराठी भाषेमुळे उच्चाराचे वळण जिभेला लागते. इंग्रजीच्या वाघिणीचे दूध पचविण्यासाठी मातृभाषा नीट समजणे गरजेचे असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.

इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी ७५ साहित्यिकांच्या माहितीचे संकलन केले. शांता शेळके, वसंत बापट, बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विविध साहित्य प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षक मोहन शेटे यांनी मार्गदर्शन केले.

Share This News
error: Content is protected !!