Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक ! अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत केला निषेध

430 0

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.मनोज जरांगे यांनी तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

जुन्नर विधानसभेचा दौरा करत असताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.अजित पवार पुण्यातील जुन्नर विधानसभेचा दौरा करत आहेत. यादरम्यान अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आळे फाटा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्ह हे झेंडे दाखवण्यात आले.

मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी अजित पवारांनी हा दौरा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या या मागणीला झुगारून अजित पवार दौऱ्यावर आले. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला. त्यांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवत, आरक्षण मिळावं यासाठी घोषणाबाजी केली. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हाती; नातू बनला आजोबांचा सारथी

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणाचा उडाला फज्जा ! चक्क पहिली शिकलेल्या कर्मचाऱ्याकडून होतंय सर्वेक्षण

Manoj Jarange : अखेर भगवं वादळं मुंबईत धडकणार ! सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ

Manoj jarange Patil : मराठा वादळ मुंबईत धडकणार ! वाहतुकीपासून ते राहण्यापर्यंत कसे आहे नियोजन ?

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!