मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे.
नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा वॉरंट काढण्यात आलाय. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते. त्यावेळी 500 रुपयांचा दंड करुन मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं होतं.
