pune

Pune News: नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथीयांचे आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

930 0

पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘नागपूरला लागलेला कलंक’ असे म्हणत जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. ही टीका करत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे मॉर्फ केलेला फोटो ट्विट करत ‘मर्दानगी वर कलंक ! **#च्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!’ अशी टीका केली होती. नितेश राणेंच्या या टीकेनंतर तृतीयपंथीय समाज आज चांगलाच आक्रमक झाला. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथीय समाजातील काही आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!