Wari Video

Wari Video : वारीत हरिनामाच्या गजरात महाराष्ट्र पोलीसही तल्लीन

725 0

पुणे : सबंध महाराष्ट्र सध्या विठूरायाच्या भक्तीत तल्लीनं (Wari Video) झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश अशा सर्व भागांमधून विविध संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत. सर्वांना ओढ लागली आहे ती विठूरायाच्या दर्शनाची. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी विठूरायाच्या भक्तीत अक्षरश: तल्लीन (Wari Video) झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसोबत टाळ-मृदुंगाच्या तालावर नृत्य करणाऱ्या पोलिसांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या पोलिसांचा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये (Wari Video) पोलीस विठ्ठलाच्या भजनावर नृत्य करताना दिसत आहेत. हे पोलीस भक्तीत इतके तल्लीन झाले आहेत की ते अक्षरश: एखाद्या लहान मुलाप्रमाणे बागडतेय, नाचतेय, बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. तसेच आजूबाजूचे वारकरी सुद्धा या पोलिसांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. पोलिसांचा हा व्हिडिओ (Wari Video) पाहून तुम्हीदेखील थिरकल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!