Zika Virus

Zika Virus : पुणेकरांनो सावधान ! शहरात आढळला झिकाचा पहिला रुग्ण

1019 0

पुणे : पुण्यात महाराष्ट्रातील सातव्या झिका (Zika Virus) प्रकरणाची पुष्टी झाली आहे. यानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यांना परिस्थितीवर पाळत ठेवण्यास सांगितलं आहे. शेजारच्या कर्नाटकातही झिकाच्या वाढत्या रुग्णांबाबत आरोग्य विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. शेजारच्या कर्नाटकातही झिकाच्या वाढत्या रुग्णांबाबत आरोग्य विभागाने इशारा दिला आहे.

पुण्यातील हे झिकाचं प्रकरण येरवड्यातील प्रतीक नगरमध्ये उघडकीस आलं 64 वर्षीय महिलेला 5 नोव्हेंबरला ताप, अंगदुखी, पुरळ आणि सांधेदुखी अशी लक्षणं जाणवू लागली. 9 नोव्हेंबर रोजी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात तिला झिका विषाणूचे निदान झाले. सध्या ती महिला बरी झाली आहे आणि तिच्यासोबत जवळच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचीदेखील टेस्ट करण्यात आली. मात्र त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. ही रुग्ण महिला ऑक्टोबरमध्ये केरळला गेली होती.

झिका व्हायरसची लक्षणे
डोळे लाल होणे, प्रचंड डोकेदुखी, ताप ,सांधेदुखी,अंगदुखी, डोकेदुखी, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या लोकांना या विषाणुने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेदेखील दिसतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!