Meera Borwankar

Meera Borwankar : पोलिसांच्या जमिनीचा ‘दादा’ मंत्र्यांनी लिलाव केला; IPS मीरा बोरवणकरांचे खळबळजनक दावे

1453 0

पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या जीवनावर आधारित मॅडम कमिश्नर हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. यामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या घरासाठीच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन पालकमंत्री दादांनी घेतला होता असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

“मॅडम कमिशनर” या पुस्तकाच्या द मिनिस्टर या प्रकारणामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. दरम्यान, मीरा बोरवणकर यांनी केलेले आरोप मात्र अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत. जमिनीचां लिलाव करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच सरकारी जमिनींचा लिलाव होतो अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

मीरा बोरवणकर या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना येरवडा इथल्या पोलिसांच्या 3 एकर जमिनीच्या लिलावाला त्यांनी स्वत: विरोध केला होता. लिलावाचा निर्णय पुण्याचे तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता असा दावा मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!