Leopard Rescue Video

Leopard Rescue Video : विहिरीत पडले बिबट्याचे बछडे, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

507 0

जुन्नर : आजकाल जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्राणी दिसून येतात. अनेकवेळा हे प्राणी मानवी वस्तीत येतात. यामुळे लोकांच्या मनात अनेकवेळा भीतीचे वातावरण निर्माण होते. यादरम्यान आता जुन्नरमध्ये बिबट्यांचे दोन बछडे आढळून (Leopard Rescue Video) आले.

काय आहे नेमके प्रकरण?
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव-आर्वी येथे नदीकाठीच्या कठडे नसलेल्या विहीरीत बिबट्याचे 2 बछडे पडले होते. विहिर मालक अनिकेत गावडे मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बछडे आढळून आले. यानंतर त्यांनी लगेच याची माहिती गावातील पशुवैद्यकीय अधिकारी व वनसमिती चे पदाधिकारी व ग्रामस्थ वैभव खिलारी,अमित तोडकर, भूषण खांडगे,आदिनाथ राजगुरू यांना दिली.

याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हॉलीबॉल खेळण्याच्या नेटच्या सहाय्याने या दोन बछड्यांना पाण्यातून बाहेर काढले. बाहेर काढलेल्या या दोन बछड्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. सध्या बिबट्याच्या बछड्यांचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!