Kashmir Ganpati : काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

733 0

पुणे : काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची (Kashmir Ganpati) दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन काश्मीर येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता.

पुण्यासह जगभरात साजरा होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव काश्मीरमध्ये होत नाही. ही बाब लक्षात घेऊन हिंदुस्थानात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणार्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसह कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा आणि अखिल मंडई या मंडळांनी गतवर्षी काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार या मंडळांनी ग्रामदेवता कसबा गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’चे संदीप कौल आणि सिशांत चाको यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानुसार काश्मीरमध्ये गणेश चतुर्थीला प्रथमच सार्वजनिकरित्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. दीड दिवसाने झेलम नदीत या बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती या ‘गणपतीयार ट्रस्ट’कडून देण्यात आली. तसेच पुण्यातील या मंडळांचे त्यांनी आभारही मानले.

Share This News
error: Content is protected !!