Jan-Shivneri

Jan-Shivneri : पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी एसटीचा नवा पर्याय; आरामदायी जन-शिवनेरी बससेवा होणार सुरु

1066 0

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सर्वांत आरामदायी व वातानुकुलित सेवा मानली जाते. आता शिवनेरी बससेवा पुणे-कोल्हापूर मार्गावर (Jan-Shivneri) धावणार आहे. येत्या आठवड्यात जन-शिवनेरी नावाने पुणे (Jan-Shivneri) ते कोल्हापूर दरम्यान दहा बस सोडण्यात येणार आहेत.

पुणे-मुंबई मार्गावर (Jan-Shivneri) एसटी महामंडळाची अत्यंत सुरक्षित, अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित शिवनेरी बससेवा सुरू होती. पण, त्या मार्गावर आता ई-शिवनेरी आल्यामुळे त्या बस इतर मार्गावर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. मुंबईशिवाय इतर शहरांसाठी या बस जन-शिवनेरी नावाने चालवल्या जात आहेत. पुणे-नाशिक मार्गावर 10 जुलैपासून विनावाहक जन-शिवनेरी सुरू करण्यात आली आहे. अत्यंत माफक दरामध्ये नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गावर जन-शिवनेरी धावत असल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Pune News : धक्कादायक! रात्री लावलेल्या दिव्यामुळे वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे-नाशिक मार्गावर (Jan-Shivneri) जन-शिवनेरीला मिळणारा प्रतिसाद पाहता पुणे-कोल्हापूर मार्गावर जन-शिवनेरी सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. येत्या आठवड्यात पुणे-कोल्हापूर अशी जन-शिवनेरी सेवा सुरू केली जाणार आहे. या मार्गावर साधारण दहा जन-शिवनेरी बस धावणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुणे ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!