Pune News Accident

Pune News Accident: आई – वडिलांचा आधार हरपला ! मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जाताना काळाने केला घात

27751 0

पुणे : पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Pune News Accident) घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी चाललेल्या आयटीतील तरुणाचा कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातामध्ये (Pune News Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. आदित्य लाहोटी (वय 30) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
आदित्य कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगरमधील आकृती कंट्रीवुड्स या सोसायटीत राहत होता. तो एका खासगी आयटी कंपनीत कामाला होता. घटनेच्या दिवशी ‘शनिवारी-रविवारी सुटी असल्याने आदित्य नियमितपणे बॅडमिंटन खेळण्यासाठी जात होता. रविवारीदेखील तो खेळण्यासाठी गेला होता. तिथून घरी परत येत असताना कात्रज-कोंढवा रस्त्यावर गोकुळनगरजवळील पॅरामाउंट सोसायटीसमोर त्याची बाईक घसरली.

यामुळे तो रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणारा मोठा ट्रेलर त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी (Pune News Accident) झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात वडील, आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आपला एकुलता एक आधार हरपल्याने लाहोटी कुटुंबासह त्याच्या सोसायटीवर शोककळा पसरली.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide