दिव्यांग पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

190 0

पुणे : दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असून त्यासाठी अशा संस्थांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियमानुसार दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी सक्षम प्राधिकारी तथा आयुक्त, दिव्यांग कल्याण यांच्याकडून संस्थेस नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आले. नोंदणी प्रमाणपत्र न घेता कार्य करणाऱ्या संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण विभाग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पुणे, ०२०-२६१३१७७४ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच apang.zppune@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!