Gram Panchayat General Elections : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश

257 0

पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता अमलांत आली असून निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ११ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला ११ ऑगस्टपर्यंत स्वतःजवळ परवाना प्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास‍ मनाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या प्रमुखावर राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!