Nilkanth Jewellers

Nilkanth Jewellers : पुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाकडून कारवाई

1024 0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर (Nilkanth Jewellers) आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची झाडाझडती सुरु आहे. हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील आयकर विभागाकडून छापे मारण्यात येत आहेत. पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू आहे. छापेमारीसाठी आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा उपलब्ध आहे. आयकर विभागाचे 40 अधिकारी छापेमारीसाठी दाखल झाले आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाच्यावतीन पहाटेपासून छापेमारी सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सच्या बाणेर आणि हडपसर या परिसरातील दुकानांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसेच ज्वेलर्सच्या मालकाच्या घरीदेखील आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!