विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे उद्घाटन

350 0

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्घाटन झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माजंरी येथील गामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या व्याख्याता डॉ. सोनाली घुले, भूषण जोशी आदी उपस्थित होते.

या ॲपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत सुरु असलेल्या कामांचे जिओ मॅपिग करण्यात येणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढून वेळेच्या बचतीबरोबर गतिमानता येण्यास मदत होणार आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डॉऊनलोड करुन नोंदणी करावी लागणार आहे.

Share This News
error: Content is protected !!