पुणे : पुण्यातील (Pune) येरवाडा कारागृहामधून (Yerawada Jail) एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात (Yerawada Jail) दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्व वादातून हा राडा झाला आहे. या प्रकरणात येरवाडा पोलिसांनी 16 कैद्यांविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे. येरवाडा कारागृहातील सर्कल तीन जवळ असलेल्या बॅरक आठ जवळ ही तुफान हाणामारी झाली आहे.
Molested : पुण्यात तरुणीची छेड काढल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल
काय आहे नेमके प्रकरण?
येरवाडा कारागृहात वर्चस्व वादातून कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या राड्याप्रकरणात पोलिसांकडून येरवडा कारागृहातील 16 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ कारागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 2700 कैद्यांची क्षमता असलेल्या येरवाडा कारागृहात सध्या 9 हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत.
Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे
मेहबूब फरीद शेख ,अनुराग परशुराम कांबळे, शुभम गणपती राठोड, रोहित चंद्रकांत जुजगर, रुपेश प्रकाश आवाडे, विशाल समाधान खरात ,आकाश उत्तम शिनगारे ,सुरज प्रकाश रणदिवे, किरण रमेश गालफाडे ,गणेश वाघमारे, मुकेश सुनील साळुंखे, सचिन शंकर दळवी, विजय चंद्रकांत विरकर, प्रणव अर्जुन रणधीर आणि प्रकाश शांताराम येवले या कारागृहातील (Yerawada Jail) कैद्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.