मोबाईल युगात मुलांवर मौजीबंधनाचे संस्कार महत्वाचे – संदीप खर्डेकर

841 0

मोबाईल युगात मुलांवर मौजीबंधनाचे संस्कार महत्वाचे असून लहान वयातील संस्कार आजन्म उपयोगी पडतात असे भाजपचे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले. याज्ञवल्क परिवाराचे कौतुक तर आहेच पण सामुदायिक मौजिबंधनाच्या कार्यक्रमात आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार करणारे पालकांचे ही विशेष कौतुक करावे वाटते, सध्या ची पिढी ही टीव्ही आणि मोबाईल मुळे वाहवत चालली असल्याची सर्वसाधारण धारणा आहे, मात्र योग्य वयात संस्कार केले तर ते आजन्म मनावर बिंबवले जातात आणि ही मुले पुढे जाऊन स्वतः चे कुटुंबासह समाजाच्या आणि देशाच्या उभारणीत ही हातभार लावतात असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.

याज्ञवल्क परिवाराच्या वतीने आयोजित सामुदायिक व्रतबंध समारंभात ते बोलत होते.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक योगेश समेळ, शाहीर हेमंत माळवे, संस्थेचे कार्याध्यक्ष जगदीश नगरकर, सचिव मनोज तारे, श्री. समुद्र व इतर मान्यवर उपस्थित होते. सातत्याने सत्तर वर्षे हा उपक्रम राबविणाऱ्या देशस्थ यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण मंडळ, य़ाज्ञव्ल्क्य आश्रमाचे कार्य स्पृहणीय असल्याचे प्रमुख पाहुणे , प्रसिद्ध उद्योजक महेश दामोदरे म्हणाले.तसेच हे कार्य अविरत सुरु रहावे यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे ही त्यांनी जाहीर केले.

यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने सर्व बटुंना बॅग, डबा व पाण्याची बाटली भेट देण्यात आली. तसेच पुढील वर्षी सामुदायिक मुंजी चा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करावा त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू असेही मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले. मुंजीचे पौरोहित्य अक्षय शेलगावकर यांनी, सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांनी केले.जगदीश नगरकर यांनी स्वागत तर मनोज तारे यांनी आभार प्रदर्शन केले.
आपला,
मनोज तारे.
मो -8975773344

Share This News
error: Content is protected !!