श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठेतील  श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार

530 0

पुणे, प्रतिनिधी – श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठ येथील तब्बल १३८ वर्षे पुरातन श्री. विठ्ठल–रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराचे ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. जान्हवी धारीवाल – बालन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून देशभर विविध प्रकारची शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कामे केली जातात. पुण्यातील नवी पेठत असलेले श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर हे पुरातन असून या ठिकाणी श्री. हनुमान, श्री. ज्ञानेश्वर माऊली, श्री. तुकाराम महाराज यांच्या मूर्तीही आहेत. या मंदिरात संपूर्ण शहरातून भाविक भक्तीभावाने दर्शनासाठी नियमित येत असतात. दरमहा एकादशीनिमित्त तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी असते. ‘श्रीमती इंद्राणी बालन’ यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या माध्यमातून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आणि नुकतेच पुनीत बालन आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. जान्हवी बालन-धारीवाल यांच्या शुभहस्ते सपत्नीक पूजा-आरती करुन या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे विश्वस्त, परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक, भाविक, माजी महापौर अंकुश काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक यावेळी उपस्थित होते.

‘‘आपल्या भक्तासाठी युगेनयुगे विटेवर उभा असलेला विठुराया आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. याच श्री विठुरायाचं आणि रुख्मिणीच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण करण्याची संधी माझ्यासारख्या त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या भक्ताला मिळणं, हे माझं भाग्य समजतो. माझ्या हातून यापुढंही अशीच सेवा घडावी, अशी मी श्री विठुरायाचरणी प्रार्थना करतो’’ असं मत युवा उद्योजक पुनीत बालन यांनी व्यक्त केलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!