पुणेकरांसाठी महत्त्वाचे : डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे ‘अव्वल’; पुण्यात डेंगूच्या एकूण 305 रुग्णांची नोंद

187 0

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांची संख्या वाढते. त्यात पुणे शहरात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण थंड झाले आहे. पावसाळी आजारांनी देखील पुण्यामध्ये जोरदार एन्ट्री करून पुन्हा एकदा पुण्याला अव्वल ठरवले आहे. पुण्यामध्ये डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येने अव्वल क्रमांक मिळवला आहे.
यावर्षी जून अखेर राज्यात डेंग्यूचे 1146 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3005 रुग्ण हे पुण्यातीलच आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुष्कळ आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरने रुग्णसंख्या दर्शविली आहे. कोल्हापूरच्या महानगरपालिका हद्दीमध्ये 52 आणि ग्रामीण भागात 105 असे एकूण 157 रुग्ण आढळले आहेत.
डेंगूसह चिकनगुनियाचे जून पर्यंत 187 रुग्ण राज्यात आढळून आले असून,पुणे शहरात त्यापैकी 112 आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन अशी संख्या रुग्णांची आहे. शहर आणि परिसरातील अशा परिस्थितीमुळे प्रशासन खडखडून जागे झाले आहे.
“पावसाळ्यात पाणी साचून राहू नये,याकडे नागरिकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. बहुतेक वेळा घरात फुल झाडांच्या कुंडीच्या तळाशी डासांची उत्पत्ती होते. त्याचबरोबर टायर,पाण्याच्या उघड्या टाक्या यामध्ये डासांची उत्पत्ती होत असते. जुलैच्या मध्यापर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून महापालिकेने परिसरात धूर फवारणी सुरू केली आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी” असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे साथ रोग अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!