पुणे: आज अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन गणेश विसर्जनाच्या निमित्ताने राज्यभरात सर्वत्र उत्साह पाहायला मिळत असून पुण्यातील विसर्जन मिरवणुकी प्रामुख्याने आकर्षण असते.
पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी पुण्यातील महात्मा फुले मंडईत असणाऱ्या लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झाली.
पुण्यातील श्री कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरी वाडा या मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन होणार आहे मागील वर्षी तब्बल 36 तास 40 मिनिट पुण्याची विसर्जन मिरवणूक चालली होती यावर्षी किती तासांत विसर्जन मिरवणूक कधी संपणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे